सहज स्वभावे गोडी ते
92.
सहज स्वभावे गोडी ते अमृती ।
पुष्पी जाण दृती अंगीच जी ॥१॥
तैसा तो स्वभाव क्रिया जे वर्तत ।
वेद मूर्तिमंत आकाराला ॥२॥
परिसाचा गुण अंगी साच खरा ।
रत्न गार हिरा सूर्य जैसा ॥३॥
बहेणि म्हणे तैसी सहज अंगी शांति ।
संतांची संपत्ती सर्व कर्म ॥४॥
