वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 1. भजनी मालिका 2026 › 1. वारकरी भजनी मालिका › 10. निवडक अभंग › 5. तुकाराम निवडक अभंग

काही नित्यनेमावीण ।

🙏 1. भजनी मालिका 2026 · ABH-072790 · अभंग क्र. ९१

91.
काही नित्यनेमावीण । अन्न खाय तोचि श्र्वान ।
वाया मनुष्यपण । भार वाहे तो वृषभ ॥१॥
त्याचा होय भुमीभार । नेणे यातीचा आचार ।
झाला दावेदार । भोगवी अघोर पितरांसी ॥२॥
अखंड अशुभ वाणी । खरे न बोलेचि स्वप्नी ।
पापी तयाहूनि । आणिक नाही दुसरा ॥३॥
पोट पोसी एकला भुती दया नाही ज्याला ।
पाठी लागे आल्या । अतीताचे दारासी ॥४॥
नांही संतांचे पूजन । न घडे तीर्थांचे भ्रमण ।
यमाचा आंदण । सीण थोर पावेल ॥५॥
तुका म्हणे त्यांनी । मनुष्यपणा केली हानी ।
देवा विसरुनी । गेली म्हणता मी माझे ॥६॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग