भक्त जे जे कर्म करित
90.
भक्त जे जे कर्म करिती । ते तू होसी कृपामूर्ती ॥1॥
हे तो नवल नव्हे देवा । भुललासी भक्तिभावा ॥2॥
वाग्दोर धरुनी दांती । चारी घोडे चहू हाती ॥3॥
धूता लाज नाही तुला । दासी जनी ह्मणे भला ॥4॥