दुसरियाचे दुःखे शिणे
87.
दुसरियाचे दुःखे शिणे ज्याचे चित्त ।
तोचि एक संत वोळखावा ॥१॥
तयासी पुसता हरील तो शीण ।
दुःख घे हिरोन रोकडेची ॥२॥
परोपकार जया आलासे विभागी ।
शांती हे सर्वांगी डोलतसे ॥३॥
बहेणि म्हणे नाही आपुले पारिखे ।
वर्ततो विवेके ज्ञानदृष्टी ॥४॥
