या परी करुनिया त्याच
89.
या परी करुनिया त्याची गती ।
निजधामा पाठविला श्रीपती ।
लोकही विस्मय पावोनि चित्ती ।
न कळे म्हणती हरिलीळा ॥१॥
हाचि ईशाचाही ईश ।
जगाचा आदी हा जगदीश ।
येथे दिसतो । मानुशवेश ।
परि हा अध्यक्ष भुवनत्रया ॥२॥
याचिया चरित्राची नवाई ।
एकेक सांगावी किती काई ।
अगाधपणेचि बाळत्वही ।
प्रथ्मचि पूतना शोषिली ॥३॥
पाठी माभळभटासी पिढेदान ।
शकट पादघतेचि उडवून ।
यावरी कागबग निर्दाळून ।
रिठासुरा चावून सांडियेला ॥४॥
अघासुरही वनी चिरिला ।
वत्सासुर तो धोपटिला ।
धेनुक प्राणेंसी बिघडविला ।
तृणावर्त लाविला मृत्युपंथे ॥५॥
ऐशी दिव्य चरित्राचिया खाणी ।
उघडिलिया येणे बाळपणी ।
पुढे जे करील तेही नयनी ।
पाहो आइको निवाडे ॥६॥
निळा म्हणे ऐसे जन ।
गोकुळींचे विस्मयापत्र ।
पुढे केशियाचे आख्यान ।
तेही सकळिक आइका ॥७॥
