वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 6. संत निळोबाराय › 1. संत निळोबाराय अभंग गाथा › १. संत निळोबा गाथा भाग १ › ३. कृष्णचरित्र

मध्ये परमात्मा श्रीह

🙏 6. संत निळोबाराय · ABH-089918 · अभंग क्र. ६८

68.
मध्ये परमात्मा श्रीहरी ।
दधिओदन घेऊनि करी ।
कवळ त्यांचिये मुखों भरी ।
आणि स्वीकारी आपणही ॥१॥
हे देखोनिया चतुरानने ।
परम संकोच मानिला मंने ।
मग म्हणे हे सध्यास्नाने ।
काहीची न करिती गोंवळ ॥२॥
आम्ही याचे शेष घेणे ।
तै ब्रम्हत्वा मुकणे ।
यज्ञी अग्रपूजेचे आवंतणे ।
कैचे येईल मग आम्हा ॥३॥
याते नाही यज्ञाचार ।
दीक्षा अथवा शिखासूत्र ।
आम्ही सोवळे निरंतर ।
करु उच्चारु वेदाचा ॥४॥
सोवळे ओेंवळे नाही यांसी ।
केले अपोषण्‍ कर्मासी ।
सेविता याचिया उच्छिष्टासी ।
होईल प्रत्यवायासी निजमूळ ॥५॥
प्रायश्चितेही घेता ।
न फिटे विटाळ तत्वता ।
ऐसे विचारुनिया विधाता ।
पालटी तत्वता ब्रम्हपण ॥६॥
निळा म्हणे ज्याचा तया ।
संदेह बाधी त्या नांव माया ।
मग तो रुप पालटूनिया ।
झाला गोंवळ वेषधारी ॥७॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग