वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › १. सार्थ अभंग १ ते ५००

कानडीने केला मर्‍हाट

🙏 3. संत तुकाराम · ABH-077469 · अभंग क्र. ६३

63.
कानडीने केला मर्‍हाटा भ्रतार । एकाचे उत्तर एका न ये ॥१॥
तैसे मज नको करू कमळापति । देई या संगति सज्जनांची ॥धृपद॥
तिने पाचारिले इल बा म्हणोन । येरु पळे आण झाली आता ॥२॥
तुका म्हणे येर येरा जे विच्छिन्न । तेथे वाढे सीण सुखा पोटी ॥३॥

अर्थ :
एका कानडी भाषा बोलणार्‍या स्त्रीने मराठी भाषा बोलणारा नवरा केला, त्यांना एकमेकांचे बोलणे न कळल्याणे विपर्‍यास निर्माण होत असे. तशी माझी स्थीति हे कमलापती, तू करू नकोस, मला संतसहवास घडू दे. त्या कानडी स्त्रीने त्याला ‘इल बा " (इकडे या) म्हंटले. त्याने बा " म्हणजे बाबा असाअर्थ : घेतला व भलता गैरसमज करून तो दूर पळू लागला. तुकाराम महाराज म्हणतात अशी परिस्थीती झाली म्हणजे जीवनात विसंगतीचे दुःख निर्माण होते.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग