ऐक बापा माझ्या पंढरी
65.
ऐक बापा माझ्या पंढरीच्या राया । कीर्तना आल्ये या आर्तभूता ॥1॥
माझ्या दुणेदारा पुरवी त्याची आस । न करी निरास आर्तभूता ॥2॥
त्रैलोक्याच्या राया सख्या उमरावा । अभय तो द्यावा कर तया ॥3॥
जैसा चंद्रश्रवा सूर्य उच्चैश्रवा । अढळपद ध्रुवा दिधलेंसे ॥4॥
उपमन्यु बाळका क्षीराचा सागरू । ऐसा तू दातारु काय वानू ॥5॥
ह्मणे दासी जनी आले या कीर्तनी । तया कंटाळुनी पिटू नका ॥6॥
