वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 6. संत निळोबाराय › 1. संत निळोबाराय अभंग गाथा › १. संत निळोबा गाथा भाग १ › ३. कृष्णचरित्र

तव पातला माध्यान्हका

🙏 6. संत निळोबाराय · ABH-089853 · अभंग क्र. ६७

67.
तव पातला माध्यान्हकाळ ।
गोवळा भुकेची झाली वेळ ।
मग पाहोनिया उत्तम स्थळ ।
सुरुतरु शीतळ छायातळी ॥१॥
तेथे बैसविल्या पंगती ।
घोंगडी घालूनिया खलती ।
कृष्ण म्हणे गाडियांपगती ।
शिदोया एकत्र कालवू ॥२॥
गोवळ म्हणती बहुत बरे ।
कृष्णा तुझिया निजकरे ।
होईल अमृतचि ते दुसरे ।
जेवू आदरे शेष तुझे ॥३॥
नारदे ते ऐकिले कानी ।
सांगे सत्यलोका जाउनी ।
ब्रम्हयाते म्हणे चक्रपाणी ।
आजि ब्रम्हरस वांटितो ॥४॥
देवा जाऊनिया तेथे ।
शेष घ्यावेजी कृष्णहाते ।
तरी हे पद राहेल निरुते ।
नाही तरी अल्पायु ॥५॥
कृष्णशेषाचा हा महिमा ।
सांगता अति निरुपमा ।
पावोनिया निष्काम कामा ।
पद अच्युत सुखप्राप्ती ॥६॥
निळा म्हणे नारदवचनी ।
ब्रम्हदेव चािलिले तेथुनी ।
पाहाती तव वृंदावनी ।
गोवळ नाचती चौफेरी ॥७॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग