प्रपंच असत्य कळो आला
64.
प्रपंच असत्य कळो आला जया ।
विषय हे तया नावडती ॥१॥
उदासीनापरी वर्ततो प्रपंची ।
आशा हे मनांची सांडोनिया ॥२॥
मनाचा स्वभाव संकल्प विकल्प ।
होय साक्षिरूप तयांचा ही ॥३॥
बुद्धीचा निश्चय अनुसंधानी चित्त ।
अहंकारी हेत अहंतेचा ॥४॥
सर्वही माईक व्यवहार जाणती ।
निश्चय अद्वैती ठेवोनिया ॥५॥
बहेणि म्हणे माया सत्य ना असत्य ।
श्रीगुरूने तत्थ्य सांगितले ॥६॥
