बहुत हिंडलो देश देशा
68.
बहुत हिंडलो देश देशांतर । परी मन नाही स्थिर झाले कोठे ॥१॥
बहुत तीर्थे फिरोनिया आलो । मनासवे झालो वेडगळची ॥२॥
बहुत प्रतिमा ऐकिल्या पाहिल्या । मनाच्या राहिल्या वेरझारा ॥३॥
चोखा म्हणे पाहता पंढरी भूवैकुंठ । मनाचे हे कष्ट दूर गेले ॥४॥
