एकमेका गौळणी करिती व
63.
एकमेका गौळणी करिती विचार । चोरी करी कान्हा नंदाचा कुमर ॥१॥ नायके वो बाई करु गत काई । धरू जाता पळुन जातो न सांपडेचि बाई ॥२॥ दही दूध लोणी चोरी करुनियां खाये । पाहू जाता कवाड जैसे तैसे आहे ॥३॥ एका जनार्दनी न कळे लाघव तयाचे । न कळेची ब्रह्मादिका वेडावले साचे ॥४॥
