वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 7. संत निवृत्तीनाथ › 1. संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा › १. संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा २२४ › १. संत निवृत्तीनाथ सार्थ गाथा

जेथे रूप रेखा ना आपण

🙏 7. संत निवृत्तीनाथ · ABH-090005 · अभंग क्र. ६५

65.
जेथे रूप रेखा ना आपण आसका । सर्व रूपे देखा हरि माझा ॥१॥
ते रूप गोजिरे नंदाघरी असे । जनीवनी दिसे गोपिकांसी ॥२॥
नादभेद कळा जेथे भेद नुठी । ब्रह्मरूपे तुष्टि अवघी होय ॥३॥
निवृत्ति जन जन वन देख । आत्मरुपभाव ब्रह्म जाला ॥४॥

अर्थ:
ज्या रंग नाही, रुप नाही, असा जो माझा हरि आहे.तोच सर्वत्र सर्व रुपानी नटला आहे. तोच परमात्मा नंदा घरी सगुण रुपात आल्यावर त्या गौवळणी येवढ्या मुग्ध झाल्या की जना वनात त्याला त्याच रुपात म्हणजे कृष्ण रुपात पाहु लागल्या. ज्याच्या मध्ये ध्वनीचे नाद किंवा भेद नाहीत तो अभेद असुन त्यांने ह्या कृष्णब्रह्मरुपात सृष्टीची तृषा तृप्त केली आहे. निवृत्तिनाथ म्हणतात त्याच्या त्या रुपाने माझा आत्मभाव त्याच्याशी एकरुप झाला म्हणुन मी जनी विजनी त्यालाच पाहात आहे.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग