वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 11. गार्‍हाणीं - अभंग ४८ ते ७७

काय सांगू यशोदेबाई ।

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-090374 · अभंग क्र. ६४

64.
काय सांगू यशोदेबाई । आम्ही घरांत बैसलो पाही । कृष्ण आला लवलाही । म्हणे मज भूक लागली ॥१॥ ऐसा लाघवी हा हरी । खोडी करी नानापरी । धारितां न धरवे निर्धारी । जातो पळुनिया दुरी ॥२॥ माझी सुन एकली घरी । नाहात होती परसद्वारीं । आपण येउनि झडकरी । उभा पुढे राहिला ॥३॥ तवं ती म्हणे का आलासी । कृष्ण म्हणे तू परियेसी । मी खेळत होतो बिदीसीं । चेंडु उडोनियां आला ॥४॥ तंव ती म्हणे पाहे कृष्णा । क्रियाहीन नष्ट तू कान्हां । घाली मिठी धरी स्तना । का गे चेंडू देईना ॥५॥ तव ती म्हणे परतां सर । कृष्ण म्हणे दे चेंडूं सत्वर । एका जनार्दनी निर्धार । परा भक्ति हे साचार ॥६॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग