उखळीबंधन
68.
उखळीबंधन
कृपा उपजली । उभा राहे वनमाळी ॥१॥
धरूनि आणीला । आजी बांधीन मी तुला ॥२॥
दावे सोडूनिया । बांधि-तसे देवराया ॥३॥
फार करितोसी खोडया । गोपी दाविती वांकु-डया ॥४॥
दावी अनंत लावीत । दोन बोटे उणे येत ॥५॥
करि-ताती चोज । परी नव्हेचि उमज ॥६॥
श्रमतसे वारंवार । पुरती करी जगदोद्धार ॥७॥
विष्णुदास नामा पुढे । आला जेथे उभी झाडे ॥८॥
