पतितपावन म्हणोनि ऐकत
63.
पतितपावन म्हणोनि ऐकत होतो दुरुनी । ते आह्यालागुनी कळो आले ॥
मी आरुस साबड माझे बोलणे बोबडे । परि तुज आवडले पांडुरंगा ॥
कळा गा कुसरी नये मज गाता । परि वो पंढरीनाथा आंगिकारले ॥
बोधला म्हणे देवा वानले तुझ्या भावा । कळो आल्या केशवा मायेबापा ॥
