वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 11. गार्‍हाणीं - अभंग ४८ ते ७७

गौळणी बारा सोळा । हो

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-090371 · अभंग क्र. ६६

66.
गौळणी बारा सोळा । हो उनी येके ठायी मेळा । म्हणती गे कृष्णांला । धरु आजी ॥१॥ कवाड लाउनीं । बैसल्या सकळजणी । रात्र होतांचि माध्यांनी । आला कृष्ण ॥२॥ दही दुध तुप लोणी । यांची भोजने आणुनी । रितीं केली तत्क्षणीं परी तया न कळे ॥३॥ थोर लाघव दाविले । सकळा निद्रेनें व्यापिले । द्वार ते नाही उघडिलें । जैसे तैसेंची ॥४॥ खाउनी सकळ । मुखा लाविले कवळ । आपण तात्काळ । पळे बाहेरी ॥५॥ एका जनार्दनी ऐशी करुनि करणी । यशोदे जवळी येउनी । वोसंगा बैसे ॥६॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग