मायविवर्जित जाले वो
68.
मायविवर्जित जाले वो । माझे गोत ते पंढरिये राहिले वो ॥१॥
पतिव्रता मी परद्वारिणी । परपुरषेसी व्यभिचारिणी ॥२॥
साचारि चौदा जाली वो । सेखी अठरा घोकुनी राहिले वो ॥३॥
निवृत्तिप्रसादे मी गोवळी वो । माझा भावो तो विठ्ठलु न्याहाळी वो ॥४॥
