असत्य हे माया म्हणो
65.
असत्य हे माया म्हणो जाता दिसे ।
सत्य म्हणता नसे ज्ञानदृष्टी ॥१॥
ऐसा हा संदेह निवारी सद्गुरू ।
विवेक निर्धारु करूनिया ॥२॥
ब्रह्माहरिहर मायेचेचि गुण ।
माया ब्रह्मी जाण बोलो नये ॥३॥
माया काल्पनिक अकल्पित ब्रह्म ।
नकळे याचे वर्म कोणेपरी ॥४॥
माया हे सावेव किंवा निरावेव ।
न कळे याचे ठाव कोणेपरी ॥५॥
बहेणि म्हणे याचे कर्म कळावया ।
वोळंगावे पाया सद्गुरूच्या ॥६॥
