परलोक नावडे इंद्राची
63.
परलोक नावडे इंद्राची संपत्ती ।
इहलोक वाटे विष जैसे ॥१॥
तो एक विरक्त ज्ञानासी अधिकारी ।
ब्रह्मप्राप्ति खरी होय तया ॥२॥
सर्व सिद्धि येता घरासी सर्वथा ।
नावडती चित्ता विरक्तीने ॥३॥
रंभा तिलात्तमा उर्वशी मेनिका ।
नावडती एका हरीविण ॥४॥
चंदन आगरु नाना उपचार ।
गमती बिखार हरीविण ॥५॥
बहेणि म्हण पूर्ण विरक्त मानसी ।
ज्ञान हे तयासी वोळंगण ॥६॥
