वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 28. संत बहिणाबाई › 1. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई गाथा

ब्रह्म तो अद्वय श्रु

🙏 28. संत बहिणाबाई · ABH-076264 · अभंग क्र. ६७

67.
ब्रह्म तो अद्वय श्रुतीचे संमते ।
वेगळी माया ते म्हणो कैसी ॥१॥
कोणासी पुसावे मायेचे ठिकाण ।
सद्गुरुवाचून सत्य जाणा ॥२॥
सुवर्णा कांकण नाममात्र भिन्न ।
ज्ञानदृष्टी जाण वोळखावे ॥३॥
तोय तरंग भेद नाममात्र ।
ऐक्य हे सर्वत्र ज्ञानदृष्टी ॥४॥
सूत वस्त्र दोन्ही ऐक्यता सहजे ।
ज्ञानदृष्टी वोजे पाहिलिया ॥५॥
बहेणि म्हणे ऐसा पाहाता विवेक ।
सहजची ऐक्य मायब्रह्म ॥६॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग