पंढरी पंढरी वाचे जो
65.
पंढरी पंढरी वाचे जो उच्चारी । तोचि संसारी तरे जाणा ॥१॥
ऐसा हा वर आहे सकळिका । पुंडलिके देखा मागितले ॥२॥
युगे अ्टावीस कर दोनी कटी । उभा असे तटी भिवरेच्या ॥३॥
जोडोनिया पाय उभारोनी बाह्या । दरूशने देता हे मोक्ष मुक्ति ॥४॥
चोखा म्हणे ऐसी दिली असे भाक । साक्ष पुंडलिक तयापासी ॥५॥
