वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › १. संत नामदेव गाथा :- भाग १ › 42. मंथनपात्र ताडण

मंथनपात्र ताडण

🙏 4. संत नामदेव · ABH-083260 · अभंग क्र. ६७

67.
मंथनपात्र ताडण

यशोदा घुसळीत । स्तन मागे भगवंत ॥१॥
घालोनी पदर । पाजीतसे जगदीश्वर ॥२॥
दूध जातसे उतोन । उठे कृष्णासी टाकून ॥३॥
मंथन पात्राते फोडीत । पळे तेथूनि त्वरित ॥४॥
मागे धांवली यशोदा । धरावया त्या गोविंदा ॥५॥
हाती न लगे जगजेठी । नामा ह्मणे होय कष्टी ॥६॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग