ओंम नमो भगवते वासुदे
66.
ओंम नमो भगवते वासुदेवाय । द्वादशाक्षरी मंत्र न जपसी काह्या ॥धृ॥
वोडियाणा बंदु घालुनि देहुडा लागसील पावा । ओतप्रोत सांडुनी मना धरिसी अहंभावो ।
ओंकार बिंदुचा तू न पावसी ठावो । बोळगे वोळगे कृष्ण द्वारावतीये रावो ॥१॥
नागिणी उत्साहे नवहि द्वारे निरोधून । नाडित्रयामाजी सुषुम्नासंचरण ।
न साधे हा मार्ग ऐसे बोलती मुनिजन । नरहरि चिंतने अहर्निशी मुक्तिस्थान ॥२॥
मोडीसी करचरण तेणे पावसी अंत समो । मोहो तृष्णा न तुटे ब्रम्ह विद्या केवी गमो ।
मोठा हा अन्यावो जे हरिचरणी नाही नमो । मोक्षाची चाड तरी मुकुंदी मन रमो ॥३॥
भांबावसी झणे हे शरीर कर्दळीस्तंभ । भस्म कृमिविष्ठा उभे आहे तो सुशोभ ।
भाविता कीटकी झाली भृंगीतिया क्रमिले नभ । भावे भक्ती सुलभ वोळगा वोळगा पद्मनाभ ॥४॥
गति मति इंद्रिये जंव आहेती समयोग । गणिता आयुष्य न पुरे जंव हे न वचे भंग ।
गमला हाचि योग जे अनुसरावा श्रीरंग । गरुडध्वज प्रसादे निस्तारिजे भवतरंग ॥५॥
वनींसिंह वसता गजी मदु केवी धरावा । वन्हि दग्धबीज त्यासी अंकुर केवी फुटावा ।
वज्रपाणि कोपलिया गिरी उदधि केवी लंघावा । वदनी हरि उच्चारी तेणे संसार केवी भुंजावा ॥६॥
तेज नयनीचा भानु जेणे तेजे मीनले ते । त्याचे मानसींचा चंद्रमा तो सिंपीतो अमृते ।
त्याचे नाभीकमळी ब्रम्हा तेणे सृजिली सकळही भूते । ते विराट स्वरुप ओळखावे विष्णुभक्ते ॥७॥
वाताघाते फुटे गगनी मेघांचा मेळावा । वारि बिंदु पदमणीपत्री केवी हो ठेवावा ।
वानराच्या हाती चिंतामणी केवी हो द्यावा । वासुदेव चिंतने तोचि कल्मषा उठावा ॥८॥
सूक्ष्म स्थूळ भूते चाळीता हे परमहंसु । शूळपाणि देवोवेवी जयाचा रे अंशु ।
शुभाशुभी कर्मी न करी नामाचा आळसु । सुखे निरंतरी ध्याई ध्याई हृुषिकेशु ॥९॥
देव देउनी उदार भक्ता देतो अमरपदे । देता न म्हणे सानाथोर वैरियासी तेचि दे ।
देहे सार्थक अंती वासुदेव आद्य छंदे । देखा अजामेळ उध्दारलो नामे येणे मुकुंदे ॥१०॥
वाडा सायासी मनुष्य जन्म पावावा । वियाला पुरुषार्थ तो का वाया दवडावा ।
काया वाचा मने करुनी मुरारी ओळगावा । व्रते एकादशी करुनी परलोक ठाकावा ॥११॥
या धनाचा न धरी विश्वास जैसी तरुवर छाया । यातायाती न चुके तरी हे भोगिसील काहृया ।
या हरिभजनेविण तुझा जन्म जातो वाया । यालागी वैकुंठनाथाच्या तू चिंती पा रे पाया ॥१२॥
इहींच द्वाद्वशाक्षरी धृव अढळपद पावला । प्रल्हाद रक्षिला अग्निषस्त्रापासूनीजळा ।
बापरखुमादेवीवरु विठ्ठलु तुम्ही ध्यारे वेळोवेळा । तो कळिकाळ पासूनी सोडवील अवलीळा ॥१३॥
