वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 7. संत निवृत्तीनाथ › 1. संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा › १. संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा २२४ › १. संत निवृत्तीनाथ सार्थ गाथा

मध्यबिंदनाद उन्मनि स

🙏 7. संत निवृत्तीनाथ · ABH-090004 · अभंग क्र. ६६

66.
मध्यबिंदनाद उन्मनि स्वानंद । रुपरस गोविंद गुणनिधी ॥१॥
ते रूप सुरवर सोविती अरुबार । नित्यता सविचार भोगीताती ॥२॥
गौळिया गोजिरे दैवत साचारे । नंदासि एकसरे प्रेम देत ॥३॥
निवृत्ति निवाला प्रेमरसे धाला । सर्व सुख डोळा हरिकृष्ण ॥४॥

अर्थ:
मध्य बिंद म्हणजे ॐकाराचा वरचा बिंदु ज्याला शुन्य म्हणा पण ह्या शुन्यात निर्मिती आहे. किंबहुना येथुन सुरवात आहे. ते स्थान शरिरात दोन डोळ्यामध्ये आहे तेथे उन्मनी अवस्थेत जो ब्रह्मानंद होतो तो स्वानंद सकल गुणाचा स्वामी गोविंद आहे. त्याच रुपा नित्य स्मरण करुन सुरवर सुख अनुभवतात.ते गोजिरे दैवत गोकुळात गौळी व नंद यांना प्रेम देत आहे. निवृत्तिनाथ म्हणतात ते सर्व गोकुळातील सुख मी माझ्या डोळ्यानी पाहिल्यामुळे निवांत झालो आहे.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग