मग म्हणे गिळिले गोप
65.
मग म्हणे गिळिले गोप ।
गाई खिल्लारांचे कळप ।
तारि हा चिरुनिया सांडीन सर्प ।
घेईन सूड या सकळांचा ॥१॥
कृष्ण शिरती त्याच्या वदनी ।
अधासुरा हर्ष न समाय मेदिनी ।
म्हणे कार्य साधिले हा चक्रपाणी ।
गिळिलियावरी सर्व माझे ॥२॥
ऐसा आनंदला अघ ।
तव लाघविया श्रीरंग ।
वाढला पाताळवरी स्वर्ग ।
नेदी जाभाडी मेळवू त्या ॥३॥
नुगळवेचि तो उगळू जाता ।
पुढेहि न चलेचि तत्वता ।
फाडूनि वदन केल्या चळथा ।
व्दिभाग करुनि सांडियेले ॥४॥
तेणे उघडया पडल्या गाई ।
गोवळ म्हणती थोर नवाई ।
निमिषमात्रेंचि गेली धुई ।
पहारे स्मरणांचे खेवा ।
देखिला श्रीहरी दृष्टिपुढे ॥६॥
निळा म्हणे सांगती नवल ।
आजी अंधारिमाजी गाई गोवळ ।
पडिले होते आणि वायो प्रबळ ।
माघारेंही सरो नेदी ॥७॥
