ब्रह्मापासुनिया जाली
66.
ब्रह्मापासुनिया जाली म्हणो माया ।
उपाधी हे तया केवी घडे ॥१॥
करावा निवाडा सद्गुरुवाचन ।
भेद निरसून विकल्पाचा ॥२॥
माया ब्रह्मी नाही ऐसे म्हणो जरी ।
स्वतंत्रता तरी म्हणो नये ॥३॥
बहेणि म्हणे ऐसा संदेह मायेचा ।
निरसी जो साचा तोचि गुरु ॥४॥
