मग होसोनिया बोलिजे क
66.
मग होसोनिया बोलिजे कृष्णे ।
बेटे हो तुम्ही अवघेचि शहाणे ।
सर्पे गिळिले होतेती प्राणे ।
कैसे तरी वांचलेती ॥१॥
बरे झाले हातो मागे ।
तेणे वांचलेतीरे प्रसंगे ।
पैल पहारे महाभुजंगे ।
चिरुनी सांडिला त्याच्या फाळी ॥२॥
पहाती तव भरोनिया दरा ।
पडिला वाहती शोणित धारा ।
म्हणती दाऊ वडिलांते नवल हे ॥४॥
ऐंसा अघासुर मर्दिला ।
कृष्णे पवाडा हा केला ।
गोवळ नाचती विजयी झाला ।
श्रीहरी आला आमुच्या सांगाती ॥५॥
कंसातेहि विदित झाले ।
जाउनी वार्तिकी सांगितले ।
तेणे चपपक त्याचे गेंले ।
म्हणे ओढवले दुर्मरण ॥६॥
निळा म्हणे इकडे गाई ।
चरता फांकल्या दिशा दाही ।
वळत्या करुनिया त्या लवलाही ।
आणिल्या वृंदावनासमीप ॥७॥
