शरीर वरिवरि का दंडिस
67.
शरीर वरिवरि का दंडिसी जंव वारिले न करी तुझे मन ।
जळी नेत्र लाऊनि ठोकती अविंशा लागोनि तैसे नको नको बकध्यान रया ॥१॥
चित्त सुचित्त करी मन सुचित्त करी । नधरी तू विषयाची सोय ।
वनी असोनी वनिता चिंतिसि तरि तपचि वाउगे जाय रया ॥२॥
त्रिकळ स्नान करिसी तिर्थजळी परि नवजाती मनींचे मळ ।
तुझियानि दोषे तीर्थ कुश्र्चित जाली जैसी त्या रजकाची शीळ रया ॥३॥
आता करिसी तरी चौखटची करी त्यासी साक्ष तुझे तुज मन ।
लटिकेन झकवसी तर्ही देव दुर्हा होसी बापरखुमादेविवरा विठ्ठलाची आण ॥४॥
