पुंडलिके सुख दाखविले
67.
पुंडलिके सुख दाखविले लोका । विज्ठल नाम नौका तरावया ॥१॥
जाय पंढरीसी जाय पंढरीसी । पाहे विठोबासी डोळेभरी ॥२॥
अवघा पर्वकाळ तयाचिये पायी । नको आणिके ठायी जाउ वाया ॥३॥
चोखा म्हणे ऐसा लाभ बांधा गाठी । जावोनिया मिठी पायी घाला ॥४॥
