कृष्ण बळराम उठिले ।
64.
कृष्ण बळराम उठिले ।
मुखमार्जने सारिले ।
तव दसवंतिया बोले ।
जेउनी जावे गोधनापाठी ॥१॥
गाई गोवळ खोळंबले होते ।
पुढे गेले ते निरुते ।
मग आणूनिया भोजनाते ।
पुढे ठेविली रत्नताटे ॥२॥
उभयता जेऊनिया उठिले ।
गोपशृंगार आणविले ।
विचित्र चोळणे कसिले ।
काचे वेष्टिले सुरंग ॥३॥
शिरी मोरविसा टोप ।
कर्णी कुंडला तेज अमूप ।
केशर चंदनाचे विलेप ।
टिळे लल्ल:टी रेखियेले ॥४॥
गुंजाहार घातले कंठी ।
खांदी कांबळी हाती वेताटी ।
मोहरी पावा गांजिवा पावा गांजिवा पाठी ।
माजि दिव्यान्ने भरियेली ॥५॥
दंडी रुमाल करी कंकणे ।
पायी वाहाणा शोभले लेणे ।
ऐसे चालता अतिसत्राणे ।
पुढे अघयाते ओळखिले ॥६॥
एक जाभाडे गगनावरी ।
दुजे पृथ्वीची ऐसे निर्धारी ।
गाई गोपाळ गेले भीतरी ।
निळा म्हणे हे जाणवले ॥७॥
