वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › १. संत नामदेव गाथा :- भाग १ › 40. गोपींची गार्‍हाणी

एक ह्मणे धरी स्तन ।

🙏 4. संत नामदेव · ABH-083851 · अभंग क्र. ६५

65.
एक ह्मणे धरी स्तन । याचे उपटीन कान ॥१॥
यशोदे तुला येईल राग । आपुल्या पोरा कांही सांग ॥२॥
अंधारी लपत । पोरे करिती आकांत ॥३॥
सांगतसो शिकवणा । खोडी नको करू कृष्णा ॥४॥
तोंड करूनि वांकडे । मला ह्मणे तशीच रडे ॥५॥
पोरा शिकवीत । गोरस आणारे समस्त ॥६॥
आह्मी निजलो समस्त । काजळ मुखासी लावीत ॥७॥
मेले आणूनिया सर्प । माझ्या पोरा दावी दर्प ॥८॥
योगियांचे नये लक्षा । त्यासी लावू ह्मणती शिक्षा ॥९॥
अनंत गार्‍हाणी । नामा ह्मणे कीर्ति वानी ॥१०॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग