धन्य जगी तोचि एक हर
68.
धन्य जगी तोचि एक हरिरंगी नाचे । रामकृष्ण वासुदेव सदा स्मरे वाचे ॥१॥
सुखद:ख समान सकळ जीवांचा कृपाळा । ज्ञानाचा उद्बोध भक्ति प्रेमाचा कल्लोळ ॥२॥
विषयी विरक्त जया नाही आपपर । सर्वदा संतुष्ट स्वये व्यापक निर्धार ॥३॥
जाणीव शहाणीव ओझे सांडोनिया दुरी । आपण वस्तीकर वर्ततसे संसारी ॥४॥
एका जनार्दनी नित्य हरिचे कीर्तन । आसनी शयनी सदा हरीचे चिंतन ॥५॥
