लागोनिया पाया विनवित
68.
लागोनिया पाया विनवितो तुम्हांला । करे टाळी बोला मुखे नाम ॥१॥
विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा । हा सुख सोहंळा स्वर्गी नाही ॥२॥
कृष्ण विष्णु हरि गोविंद । मार्ग हा प्रांजळ वैकुंठीचा ॥३॥
सकळांसी येथे आहे अधिकार । कलियुगी उद्धार हरिनामे ॥४॥
तुका म्हणे नामा पासी चारी मुक्ति । ऐसे बहु ग्रंथी बोलियेले ॥५॥
69
कामामध्ये काम । काही म्हणा राम राम ।
जाईल भवश्रम । सुख होईल दु :खाचे ॥१॥
कळो येईल अंतकाळी । प्राणप्रयाणाचे वेळी ।
राहाती निराळी । रांडापोरे सकळ ॥२॥
जीता जिसी जैसा तैसा । पुढे आहे रे वोळसा ।
उगवुनी फांसा । काय करणे ते करी ॥३॥
केले होते याचि जन्मे । अवघे विठोबाच्या नामे ।
तुका म्हणे कर्मे । जाळोनिया तरसी ॥४॥
