उदय सुर्याचा जाला ।
67.
उदय सुर्याचा जाला । मिळाला गौळणीचा मेळा । धाउनी सकळा । आलीया अंगणी ॥१॥ बोलती आणि संक्रोधें । थोर पीडेलें बाळके । चोरी करुनियां देखे । आला पळोनि ॥२॥ आमुचीं फोडिली भाजनें । दही दुध खादले येणे । एका जनार्दनी तान्हें । यशोदे तुझे ॥३॥
