कोण भाग्य तया सेना न
18.
कोण भाग्य तया सेना न्हावियाचे । नीच काम त्याचे स्वये करी ॥१॥
घेउनी धोकटी हजामत करी । आरसा दावी करी बादशहासी ॥२॥
कसाबाचे घरी विकितसे मांस । राका मेहल्यास हुंडी भरी ॥३॥
बंका म्हणे ज्याचे पुराणी पवाडे । तो भक्त सांकडे वारीतसे ॥४॥
