उदंड पाहिले उदंड ऐकि
18.
उदंड पाहिले उदंड ऐकिले । उदंड वर्णिले क्षेत्रमहिमे ॥१॥
ऐसी चंद्रभागा ऐसे भीमातीर । ऐसा विटेवर देव कोठे ॥२॥
ऐसे संतजन ऐसे हरिदास । ऐसा नामघोष सांगा कोठे ॥३॥
तुका म्हणे आम्हा अनाथाकारणे । पंढरी निर्माण केली देवे ॥४॥