सखी पुसे सखीयेसी । य
17.
सखी पुसे सखीयेसी । युगे झाली अठ्ठावीसी ।
उभा ऐकिला संतांमुखी । अद्यापी वर ।
कटावरी कर । भीवरा तीर वाळुवंटी संत सभा सभा ॥१॥
देव कांहो विटेवरी उभा उभा ॥धृ॥
पुसू नका बाई । वेदासी काई । कळलेंचि नाही ।
शेष शिणला जाहल्या द्विसहस्र जिभा जिभा ॥२॥
जेथे करिताती गोपाळ काला । हरिनामी तयांचा गलबला ।
देव भावाचा भुकेला । मिळाले संत । मदनारी ।
तो हरि आला । तयांचिया लोभा लोभा ॥३॥
हरि वैकुंठांहूनि । आला पुंडलिकालागुनी ।
उभा राहिला अझुनी । युगानुयुगे ।
भक्तासंगे । एका जनार्दनी संत शोभा ॥४॥
