वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 31. संत माणकोजी बोधले › 1. संत माणकोजी महाराज बोधले अभंग गाथा › 1. संत माणकोजी महाराज बोधले संपूर्ण अभंग गाथा › 1. संत माणकोजी महाराज बोधले एकूण अभंग 110

उठा उठा हो विठोबा झड

🙏 31. संत माणकोजी बोधले · ABH-080956 · अभंग क्र. १७

17.
उठा उठा हो विठोबा झडकरी चला बाहेर । जडमुढ पाषाण यांचा करा उध्दार ॥
झडकरी उठोनिया कृपादृष्टीत्वा पाहावे । आपुले प्रेमसुख आम्हा भक्तासी द्यावे ॥
तोडुुनी भ्रांतीचे पडळ शुध्दबुध्द करावे । कायाकाशी पूर्णवासी स्नान धाडावे ॥
प्रयाग प्रयागी पिंड देऊनी दान' । सावध होऊनी करी गा हरिभजन ॥
विश्वाचा त्रिकुट शिखरी राहे । तयाचे दर्शने जन्म पुनित होये ॥
बोधला म्हणे देवा सकळ तीर्थी मी न्हालो । स्वामीच्या दर्शने जन्म पुनित जाहलो ॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग