द्वादशी क्रमोनी त्रय
18.
द्वादशी क्रमोनी त्रयोदशी आत ।
वत्सासी देहान्त-समय आला ॥१॥
तेथे हिरंभट बोलियेला श्लोक ।
सहज स्वाभाविक ‘ मूकं करोति’ ॥२॥
पूर्वार्ध श्लोकाचा सरताचि जाण ।
बोलिले आपण वत्स तेव्हा ॥३॥
‘ यत्कृपा तमहं वंदे’ बोले शब्द ।
श्लोक-उत्तरार्ध वत्स बोले ॥४॥
आइकिला सर्व लोकी तो श्लोकार्ध ।
करिती संवाद परस्परे ॥५॥
तव त्या वत्साने टाकियेला प्राण ।
आले मी धावोन तयापासी ॥६॥
प्राणासवे प्राण जाऊ पाहे माझा ।
प्राक्तनासी दुजा प्रयत्न नाही ॥७॥
गाय हुंबरडे दोहीवरी मान ।
टाकी परी जाण शब्द कैचा ॥८॥
बहेणि देह प्राक्तने राखिले ।
पुढे काय जाले कोण जाणे ॥९॥
