वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 7. संत निवृत्तीनाथ › 1. संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा › १. संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा २२४ › १. संत निवृत्तीनाथ सार्थ गाथा

हरिविण व्यर्थ आचार स

🙏 7. संत निवृत्तीनाथ · ABH-090157 · अभंग क्र. १७

17.
हरिविण व्यर्थ आचार समर्थ । हरि हेचि हेत अरे जना ॥१॥
ते रुप पंढरी पुंडलिक संगे । एका नामे पांग पाश तोडी ॥२॥
सर्व ब्रह्मार्पण क्रिया करी जाण । वेद मते खुण ऐसी असे ॥३॥
निवृतिचा देव सर्व हा गोविंद । नाही भिन्न भेद विश्वी इथे ॥४॥

अर्थ:
हे लोक हो हरिविण कोणताही आचार श्रेष्ट नाही. हरिची प्राप्ती हाच समर्थ विचार आहे. त्या विठ्ठल नामाने सर्व पाश सुटतात तो श्री विठ्ठल पंढरीत उभा आहे. आपली सर्व कर्म त्याला अर्पण करावीत हे वेदांचे मत आहे. निवृतिनाथ म्हणतात हा माझा गोविंद भिन्न रुपात भासत असला तरी तो एकत्व रुपाने त्यात आहे.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग