वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 7. संत निवृत्तीनाथ › 1. संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा › १. संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा २२४ › १. संत निवृत्तीनाथ सार्थ गाथा

भाग्याचेनि भाग्य उदो

🙏 7. संत निवृत्तीनाथ · ABH-090168 · अभंग क्र. १८

18.
भाग्याचेनि भाग्य उदो पै दैवयोगे । ते पुंडलिका संगे भीमा तटी ॥१॥
ध्यान मनन एक करिता सम्यक । होय एका एक एक तत्व ॥२॥
उदो अस्तु मेळे ब्रह्म न मैळे । भोगिती सोहळे प्रेम भक्त ॥३॥
निवृत्ति निवांत विठ्ठल सतत । ना घे दुजी मात हरिविण ॥४॥

अर्थ:
दैवयोगाने भाग्याचा उदय झाला म्हणुन पुंडलिकाच्या संगतीने भीमातीरी परब्रह्म अवतरले. हा परब्रह्म म्हणजे एकच तत्व आहे हे ध्यान व मननाने कळते. भक्त हे प्रेम सुख सतत भोगत राहतात जसा सुर्य व चंद्राला उदय अस्त असतो तसा ह्या प्रेमसुखाला नाही. निवृत्तिनाथ म्हणतात मी निवांत ह्या विठ्ठलाचे भजन करतो इतर मतांचे काही ऐकत नाही.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग