कोण जाणे याचे अंगींच
18.
कोण जाणे याचे अंगींचिया कळा । सुखाचा सोहळा विटेवरी ॥१॥
आपुलिया लोभे आपणचि आले । आपणचि नटले रूप देखा ॥२॥
भक्तांचा प्रेम धरोनी आवडी । उभाविली गुढी विठ्ठलनामे ॥३॥
चोखा म्हणे ऐसे रंगोनी रंगले । पंढरीये राहिले भक्तांघरी ॥४॥