किती किती बोलू देवा
18.
किती किती बोलू देवा । किती करू आता हेवा ॥१॥
बहु चाळवणा तू होसी । नाही का रे म्हणे मजसी ॥२॥
आता न धरी तुमची भीड । मज नाही दुजी चाड ॥३॥
किती बोलू देवा । आता राग न धरावा ॥४॥
धरणे घेतिले तुमचे द्वारी । म्हणे चोख्याची महारी ॥५॥
