शिव, ब्रह्मा, विष्णु
18.
शिव, ब्रह्मा, विष्णु तिन्ही एक देव ।
जे निराकार सम्यक, विठ्ठल माझा ॥१॥
विठ्ठलनामाचा महिमा अगाध ।
होणें पूर्ण बोध ऐसा परी ॥२॥
अद्वैत वासना संतांची संगती ।
रायांची उपाधी बोलू नये ॥३॥
हरी, मुकुंद, मुरारी ।
हा मंत्र उच्चारीं, सांवता म्हणे ॥४॥
