एक आपण साधू झाले । य
17.
एक आपण साधू झाले । येर कोण वाया गेले ॥१॥
उठे विकार ब्रम्ही मूळ । अवघे मायेचे गाबाळ ॥२॥
माया समुळ नुरे जेंव्हा । विश्व ब्रम्ह होईल तेंव्हा ॥३॥
ऐसा उमज आदी अंती । मग सुखी व्हावे संती ॥४॥
चिंता क्रोध मागे सारा । ताटी उघडा ज्ञानेश्वरा ॥५॥
