ऐसे बहुत काळ लोटलिया
19.
ऐसे बहुत काळ लोटलियावरी । पुण्याची सामोग्री हारपली ॥१॥
मरोनिया जन्म हरणाचा पावला । पतिव्रता झाल्या कुरंगिणी ॥२॥
प्रारब्धाचा भोग सुटेना कोणासी । केली जैसी तैसी घ्यावी फळे ॥३॥
नामा म्हणे देव कृपा करील जरी । सुटेना तोंवरी भोग खरा ॥४॥
