जन हे सुखाचे दिल्या
18.
जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे । अंत हे काळीचे नाही कोणी ॥१॥
झाल्या हीन शक्ति नाकडोळे गळती । सांडोनिया पळती रांडापोरे ॥२॥
बाईल म्हणे खर मरता तरी बरे ॥नासिले हे घर थुंकोनिया ॥३॥
तुका म्हणे माझी नव्हतील कोणी । तुज चक्रपाणी वांचूनिया ॥४॥
