राष्ट्र करी पाप राजा
18.
राष्ट्र करी पाप राजाने भोगावे । राजियाचे ते सर्व पुरोहिता ॥१॥
बोले धर्मशास्त्र जाणती सर्वही । परी ते कोणाही न कळे वर्म ॥२॥
शिष्ये केले पाप भोगावे गुरूने । स्त्रिने केले घेणे पुरुषासी ॥३॥
नामा ह्मणे जन मायेंत गुंतले । सेखी खाती झोले संसाराचे ॥४
