देवा माझे मन लागो तु
18.
देवा माझे मन लागो तुझे चरणी । संसार व्यसनी पडो नेदी ॥१॥
नामस्मरण घडो संतसमागम । वाउगाचि भ्रम नको देवा ॥२॥
पायी तिर्थयात्रा मुखी रामनाम । हाचि माझा नेम सिद्धि नेई ॥३॥
आणिक मागणे नाही नाही देवा । एकाजनार्दनी सेवा दृढ देई ॥४॥
